उस्मानाबाद -  जिल्हा सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता तसेच सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या नव्याने नियुक्तीसाठी राज्य शासनाकडे नामिका पाठविली जाणार असून यासंदर्भातील अधिसूचना न्यायालयाचे तसेच जिल्हा वकील संघ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तरी या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्यांनी विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह 31 मार्च, 2015 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
  सुचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत पदाच्या पात्रतेबाबत तपशील नमूद करण्यात आला आहे.  विहित नमुन्यातील अर्ज www. osmanabad.nic.in या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत, असे कळविण्यात आले आहे.    

 
Top