उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या  ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमात दुस-या दिवशी (दि. 3 मार्च) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार प्रख्यात लेखक प्रा. मिलींद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रा. जोशी यांचे आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे – विनोदाची दोन शिखरे या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळच्या सत्रात 6 वाजता बळीराजाच्या कविता हा शेतकऱ्यांचा संघर्ष कवितेतून मांडणाऱ्या मराठवाड्यातील कवींची काव्यमैफील होणार आहे. 
त्याचबरोबर, ग्रंथोत्सवात मराठवाड्यासह, सोलापूर, पुणे, सातारा येथील ग्रंथ प्रकाशक सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर शासकीय ग्रंथागार, औरंगाबाद यांचा शासकीय प्रकाशनांचा स्टॉल याठिकाणी आहेत. रसिक वाचकांनी अधिकाधिक संख्येने याठिकाणी भेट देऊन पुस्तके खरेदी करावीत आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.                                   

 
Top