पिंपरी  - चिखली प्राधिकरण  येथील राजे शिवाजी नगर सेक्टर नंबर-१६येथे  राजे शिवाजी युवा मंचच्या वतीने  शिव जयंती महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.   शिव जयंतीच्या प्रसंगी शिवनेरी ते राजे शिवाजी नगर पर्यंत शिवज्योत आणण्यात आली. या मध्ये सुमारे शेकडो  कार्यक
र्त्यांनी सहभाग घेतला.  शिवज्योत आणल्या नंतर महिलांनी औक्षण करून महाराजांची आरती करण्यात आली.
          भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, आमदार महेश लांडगे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक दत्ता साने, भाजपा सरचिटणीस विलास मडेगिरी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, उद्योजक ज्ञानेश्वर कडू, अनिल शितोळे आदि  मान्यवरांनी भेट दिली.सोमवार दि. ९ रोजी रंगात रंगला महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम संस्थे तर्फे ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचेमुख्य संयोजन संस्थेचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सचिन  ठाकूर, योगेश कपिले, विलास घोगरे, प्रशांत मरळेकर, हरी पाटेवर, पंकज गायकवाड, अभिजित भैरवकर,  निखिल इंगळे, अथर्व शहा, पारस शिरसाठ, संजय बनकर, महेश देडे सह इतर कार्यकर्त्यांनी केले. 

 
Top