पांगरी (गणेश गोडसे) राजकारणापुरते समाजकारण करणे आपल्या रक्तात नसून एखाद्या गावातून मताधिक्य मिळो अथवा ना मिळो,सत्ता असो किवा नसो तालुक्यातील जनतेसाठी आपण खंड कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.                                                                                                                         पांगरी ता.बार्शी येथे पूरक राष्ट्रीय पेयजल योजनेतुण पांगरीसाठी मंजूर झालेल्या पावणेदोन कोटी रूपयाच्या योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील-चारेकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी पंचायत समि
तीचे सभापति भाऊसाहेब काशिद,माजी उपसभापती केशव घोगरे,पंचायत समिति सदस्य लक्ष्मण संकपाळ,सरपंच विजय गोडसे,उपसरपंच सतीश जाधव,संजीव बगाडे,माजी सभापती विजय गरड, पाणीपुरवठ्याचे उपविभागीय अभियंता श्री.नलावडे,श्री.एन.के.कापसे,ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
   राऊत पुढे बोलताना म्हणाले की ही योजना मंजूर करण्यासाठी तब्बल दोन वर्ष प्रयत्न करावे लागले.अनेक अडचणी आल्या,पानी साठा आरक्षित करण्यासाठी तत्कालीन मंत्रिमंडळाची मंजूरी आणली.
  या योजेनेसाठी पाठरी तलावातून 0.20 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा पांगरीसाठी आरक्षित करण्यात आला असल्यामुळे पांगरीसारख्या मोठ्या गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रा.विशाल गरड यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.यावेळी माजी सरपंच जयंत पाटील,बापू पवार उपस्थित होते.

 
Top