उस्‍मानाबाद -  बेंबळी ता. उस्‍मानाबाद येथे शिवजयंती व महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या 9 व्‍या वर्धापन दिनापासून मनसे उस्‍मानाबाद तालुका शाखेच्‍यावतीने सुरू केलेल्‍या बांधकाम कामगार नोंदणी  अभियान अंतर्गत बेंबळी येथे कामगाराची नोंदणी व  कामगारांच्‍या मुलांना पुस्‍तक संच वाटप कार्यकम संपन्‍न झाला.
      बेंबळी, बरमगाव, अनसुर्डा, ताकविकी, महादेववाडी येथील कामगार व त्‍यांची मुले या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे तालुकाध्‍यक्ष पाशाभाई शेख यांनी केले. या कार्यक्रमास माजी तालुकाध्‍यक्ष अभिजीत पतंगे, माजी तालुका सचिव गणेश जगताप, तालुकाध्‍यक्ष तथा
बेंबळी ग्रा.प. सदसय बागल,  तालुका उपाध्‍यक्ष मुरली देशमुख,  बेंबळी शहराध्‍यक्ष बालाजी शिंदे, बेंबळी शहर उपाध्‍यक्ष रामभाऊ मोटे, राम काशीद, शंकर वाघे,  मुकुंद आगलावे, धनंजय दाणे, कोंडचे शाखा अध्‍यक्ष चंद्रकांत शेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया राहुल कोरे)

 
Top