पांगरी (गणेश गोडसे) पांगरी ता.बार्शी येथील कु.जरीना नुरमहमद बागवान हिने लोकसेवा आयोगातर्फे 2013-14 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.तिची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
       कु.जरीना बागवान हिने कोणत्याही  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा आधार न घेता हे यश मिळवले आहे.तिचे प्राथमिक व माध्यमिक  शिक्षण पांगरी येथे झाले.नंतर मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत व घरी बशूनच तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे.कु.बागवान हिची पोलिस
उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top