बार्शी -   शहर व तालुक्यातील अवैध दारुविक्री, मटका, जुगार, गांजा, वाळू तस्करी इत्यादी बेकायदा धंद्याविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने बार्शी तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही संगणमताने या व्यवसायांना पाठबळ मिळाल्याने राजरोसपणे व खुलेआम बेकायदा धंदे बोकाळल्याचे उपोषणकर्ते गणेश शिंदे, बाबासाहेब खडतरे, किशोर कांबळे, बाळू कांबळे, सतिश डोळसे, बाबू भालेराव यांनी सांगीतले.

 
Top