बार्शी - महाराष्‍ट्र सरकारच्‍या संतनाथ कारखान्‍यावरील प्रशासन नियुक्‍तीच्‍या निर्णयाचे स्‍वागत करत माजी मंत्री आ. दिलीप सोपल यांनी नव्या प्रशासकीय मंडळाला कारखाना शेतकरी हितासाठी चलविण्‍यास शुभेच्‍छा व सहकार्य करण्‍याची भुमीका एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. 
    दोन जिल्‍हे आठ तालु‍के कार्यक्षेत्र असलेल्‍या संतनाथ साखर
कारखान्‍याचा कारभार अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी, सरकार, कामगाराच्‍या मदतीने चालविला. नैसर्गिक राजकीय हेतुने निर्मित मानव निर्मित संकटाचा सामना करीत कारखान्‍याचा कारभार चालविला. ऐतिहासिक कर्ज माफी मिळवली. या संपूर्ण व्‍यवस्‍थेचे सर्व सभासद साक्षीदार आहेत. संकटाच्‍या मालिकांनी कारखान्‍याची चाके बंद पडली होती. असे सोपल म्‍हणाले. महाराष्‍ट्रातील भाजपा - शिवसेना सरकारने कारखान्‍यावर प्रशासक मंडळ नेमण्‍याचा जो निर्णय घेतला आहे. त्‍या निर्णयाचे मी स्‍वागत करतो. नव्‍या प्रशासकीय मंडळाने सभासद शेतक-याच्‍या हितासाठी कारखाना चालविण्‍यासाठी भुमिका घेतल्‍यास सर्वोतोपरी सहकार्याची  भुमिका राहील.असेही आ.  सोपल यांनी सांगितले.

 
Top