बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंज्ञ शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बार्शीतील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मळेगाव (ता.बार्शी) येथे ६ ते १२ मार्च २०१५ पर्यंत राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शिबीरात राज्यभरातून सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. या शिबीरात विविध तज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य शिवपुत्र धुत्तरगाव, विभागप्रमुख एस.एम. केमदारणे यांनी दिली.
या शिबीराचे उद्घाटन बीएसएनएलचे महाप्रबंधक शिवशंकर याच्या हस्ते, माळी शुगरचे तज्ञ संचालक राजेंद्र गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली, तहसिलदार बालाजी सोमवंशी, वर्षाताई झाडबुके-ठोंबरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.बी.एन. कांबळे, प्राचार्य शिवमुत्र धुत्तरगाव, मळेगावचे सरपंच गुणवंत मुंढे यांच्या उपस्थितीत होत आहे. दि.७ रोजी मानसोपचार डॉ.कृष्णा मस्तूद यांच्या उपस्थितीत कर्करोग जनजागृती या विषयावर कॅन्सरतज्ञ डॉ.मनोज लोखंडे यांचे मार्गदर्शन व पशुचिकीत्सा शिबीर, दि.८ रोजी बापूसाहेब बेणे यांच्या उपस्थितीत मॅच्युअल फंड व करिअर या विषयावर युटीआय म्युच्युअल फंड चे योगेश गादीकर यांचे मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी, दि. ९ रोजी रासेयो चे जिल्हा समन्वयक संतोष राजगुरु यांच्या उपस्थितीत युवाशक्ती-राष्ट्रशक्ती या विषयावर इनोव्हेशन पुणेचे प्रा.गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन व माती,पाणी परीक्षण मार्गदर्शन, दि.१० रोजी रासेयो समन्वयक डॉ.तुकाराम शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना व युवक या विषयावर प्रा.डॉ.संजय चाकणे यांचे मार्गदर्शन व परिसंवाद व गटचर्चा, दि.११ रोजी जलतज्ञ अरुण देशपांडे यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार या विषयावरील हिवरे बाजारचे पोपटराव पवार मार्गदर्शन व रक्तदान शिबीर, दि.१२ रोजी कृषि विकास प्रतिष्ठान,बारामतीचे विश्वस्त सौ.नंदाताई पवार यांच्या उपस्थितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एन. मचलदार, बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरा दरम्यान श्रीमती प्रभाताई झाडबुके, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे, कुलसचिव ऍड्. िएवशरण माळी, डॉ.भिमाशंकर भांजे, बी.पी.पाटील, संजय अनपट, सुरेश काकाणी, नगराध्यक्ष रमेश पाटील, गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, महेश कुगावकर, भाऊसाहेब काशीद, टेनिसपटू कु.प्रार्थना ठोंबरे हे सदिच्छा भेट देणार आहेत.
शिबीर यशस्वीतेसाठी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन. मालदार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन, माजी आमदार श्रीमती प्रभाताई झाडबुके, संचालिका वर्षाताई ठोंबरे विशेष लक्ष देत आहेत.

 
Top