उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात विविध सांस्कृतीक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
           उस्‍मानाबाद  जिल्हा शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती उद्या रविवारी दि.८ मार्च रोजी साजरी करण्यात येणार असून या निमित्ताने शहर व जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात असणा-या शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थित होते. या दुग्धभिषेकानंतर याच चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 
          यानंतर शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हा शासकीय रुग्नालयातील रुग्नांना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील व जिल्हा पदाधिका-यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. शिवाजी चौकातून या रॅलीस प्रारंभ होणार असून ही रॅली शम्स चौक, नेहरु चौक, काळा मारुती, बार्शी नाका, प्रशासकीय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे शिवाजी चौकात येवून त्या ठिकाणी या रॅलीची सांगता होईल. या रॅलीनंतर दुपारी १२ वाजता भोसले हायस्कुल येथे होणा-या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गौरीष शानभाग, सहसपंर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांच्या पुढील शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. दुपारी ३ वाजता शिवाजी चौक येथूनच शिवप्रेमी नागरिकांची छत्रपतीच्या पुतळ्यासह भव्य मिरवणूक निघणार आहे. शिवजयंती साठी लागणारे भगवे झेंडे, कार्यक्रमाची माहिती देणारे फलक आदिची जय्यत तयारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून या शिवजयंती उत्सवात जिल्हा व शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले आहे.

 
Top