उस्‍मानाबाद - मौजे-वांगी (बु.) ता. भुम येथील शेतकरी जांबुवंत ज्ञानदेव गुंजाळ यांची शेत जमीन गट नं.69 मधील स्‍वतंत्र विहीरीचा मावेजा मंजुर झालेला होता. त्‍याबाबत भुसंपादन कायदा कलम 20 (2) नुसार मावेजा घेवुन जाण्‍याबाबत उस्‍मानाबाद येथील मांजरा प्रकल्‍पाच्‍यावतीने नो‍टीस देण्‍यात आली होती.मात्र गावातील शेतकरी उत्रेश्‍वर विठोबा गुंजाळ यांनी विनाकारण अर्ज दिला होता. व सदर 
     
प्रकरण 2012 मधील आहे.त्‍याबाबत जांबुवत गुंजाळ यांनी वेळोवेळीस पैसे मिळणे बाबत पाठपुरावा केला. परंतु मावेजा मिळाला नाही म्‍हणुन शिवसेना शेतकरी भुम तालुका प्रमुख महादेव पारे यांच्‍या नेतृत्‍वाखा‍ली जांबुवंत गुंजाळ यांनी कायदेशीर अटीचे पालन करून दि.23 मार्च व 31 मार्च पर्यंत अमरण उपोषण केले व सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन यांनी जांबुवंत गुंजाळ यांच्‍या खात्‍यावर पैसे जमा केले. याबाबत जांबुवंत गुंजाळ यांची बाजू अॅड अंकुश मेटे यांनी मांडली.
(छाया राहुल कोरे)

 
Top