उस्मानाबाद - स्टेट बँक ग्रामीण  स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखाली 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी उस्मानाबाद येथे 1 ते दि. 21 एप्रिल या कालावधीत  टेलरींग व डिझायनिंग  या  विषयाचे प्रशिक्षण आणि 1 मे ते 30 मे या कालावधीत ब्युटी र्पालर मॅनेजमेंट  प्रशिक्षण येथील राजे कॉम्प्लेक्स 3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद  येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात मोफत भोजन व निवासाची  सोय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी या  संधीचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराची निर्मिती  करुन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे.
प्रशिक्षण प्रवेशासाठी दारिद्रय रेषेखालील दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड व रेशनकार्ड, जन्म तारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 5 फोटो कागदपत्रे आवश्यक आहे. महिला प्रशिक्षणार्थ्यांला स्वयंरोजगार करण्याची  मनस्वी इच्छा असावी,  प्रशिक्षण कार्यक्रम निवडताना स्वत:ची आवड, शारिरीक क्षमता, आर्थीक कुवत,आजूबाजुला उपलब्ध असणारे साधन सामुग्री, उत्‍पादनासाठी बाजारपेठ व मागणी यांचा पूर्णपणे विचार करणे आवश्यक  आहे.  या प्रशिक्षणासाठी कमीत कमी शैक्षणीक पात्रता पाचवी पास असावी.  
या प्रशिक्षणात आवश्यक योग/ व्यायाम, व्यक्तीगत विकास, बँक कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन व मार्केटींग शिकविले जाणार आहे. भरपूर प्रात्यक्षिके आणि सराव, उत्तम आणि अनुभवी  शिक्षक संपर्कासाठी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था पवन राजे कॉम्पलेक्स तिसरा मजला औरंगाबाद रोड, उस्मानाबाद  संचालक राजन चुंबळे यांचा मो. क्र. 7875443799, श्री. गोफणे, 9763624998, सौ.सरपाळे-7030320255, श्री. शेख, 9923069923, श्री सुरवसे, 9552858521  यांचेशी   संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                    
 
Top