उस्मानाबाद - सैन्य दलात तसेच पोलीस दलात नोकरी करणे ही  बऱ्याच तरुणांची मनोमन इच्छा असते. मात्र अचुक मार्गदर्शन व योग्य प्रशिक्षणा अभावी ही इच्छा अपुरी राहू शकते. अशा सर्व तरुणांच्या आकांक्षा पूर्तीसाठी मेस्को कॅरिअर आकॅडमी, करंजे नाका, सातारा येथे माफक दरात दर्जेदार सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ पात्र युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि) यांनी केले आहे.
         या ॲकॅडमीमध्ये आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, अर्धसैन्‍य बल व महाराष्ट्र पोलीस या दलातील वेगवेगळया पदासाठी प्रशिक्षण दिले जाते. उदा-  सैनिक जीडी, टेक्नीकल सैनिक क्लॉर्क, स्टोर कीपर, नावीक , नौदल, सिनियर सेंकडरी रिक्रुटस, वायु सैनिक, अर्ध सैन्य बल व पोलीस कॉन्स्टेबल वगैरे या ॲकॅडमी मध्ये शारिरीक तयारी माजी सैनिक प्रशिक्षक करुन घेतात. तर शैक्षणिक तयारीसाठी शाळांतुन निवृत्त झालेले उच्च शिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत.        
          हे प्रशिक्षण शिबीर 2 एप्रिल 2015 पासून सुरु होणार आहे. या प्रशिणाचा कालावधी हा शाळा, कॉलेजच्या आवकाशात असल्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या उमदेवारांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. तरी इच्छुक युवकांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा.
         ॲकॅडमीचे प्रशिक्षण 60 दिवसाचे असून निवास व भोजनासह  प्रशिक्षणाचे शुल्क रुपये 12 हजार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर यातील 500 रुपये प्रोत्साहनपर परत दिले जाते.  प्रशिक्षण व अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वा वेळेत देण्यात येते. अधिक माहिती व प्रशिक्षासाठी संपर्क मोबाईल क्र.-7588624043 किंवा 9420697807 वर संपर्क साधावा व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्कोच्या http://mescoltd.com  या संकेतस्थळासही भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top