पांगरी (गणेश गोडसे ) दिवसेंदिवस शेती व्यवसाय अडचणीचा व तोटयाचा ठरत असल्यामुळे कांहीतरी वेगळा पर्याय काढून शेतीतून उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असला तरी निसर्गाचे दुष्टचक्र कांही केल्या शेतकर्‍यांची पाठ सोडण्यास तयार नाही. शासन,प्रशासन,कृषि खाते यावर कांही भरीव कार्यवाही करण्यास तयार नसल्यामुळे दिवसेंदिवस बोर उत्पादक आर्थिक अडचणीत जात आहे.
    सततच्या अवकाळी पावसामुळे येथील बोर शेतीला उतरती कळा  लागली आहे.अवकाळी पावसामुळे बोरे बेचव होऊन बाजारपेठेत म्हणावी अशी मागणी रहात नसल्यामुळे अवकाळी पाऊस हा बोर शेतीसाठी तारक नव्हे तर मारक असा ठरत आहे.
  विश्वास काशिद (माजी सरपंच व बोर उत्पादक कुसळंब) सलग चार वर्षापासून दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या बोर उत्पादकला झाडे जोपासण्यासाठी सरकारने तात्‍काळ मल्चिंग पेपर व पाण्यासाठी अनुदान मंजूर करून तात्काळ कार्यवाही करावी.तावडी येथील तलावात मुबलक पाणी असतांनाही उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे दहा लाखाचे नुकसान झाले.
अनंत चौधरी: कृषि खात्याने शेतकर्‍यांना बोरांचे नवीन वान विकसीत करण्यासाठी  प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन मेळावे घ्यावेत. सुयोग काशिद तीन गांवांच्या शिवेवरून पाणी आणून बागा जोपासण्याचा प्रयत्न केला.  मात्र तरीही पाण्याभावी बागा टिकू शकल्या नाहीत.नवनाथ पायघन:अनेक वर्षापासून जिवापाड जपलेल्या बागा सांभाळण्यासाठी 11 बोअर घेतले,मात्र तरीही बागा जतन करू शकलो नाही.
गणेश चौधरी:आरंगांव येथील शिवारातून ताशी 1000 रुपये पाणी घेऊन बोर बागा जोपासण्याचा प्रयत्न केला मात्र तो पाण्याचा स्त्रोत्रही बंद पडल्यामुळे बागा वाळून जात आहेत.जमिनीची पानी पातळी खूपच खालावली आहे.


 
Top