उस्मानाबाद -  ‍महिला स्वयंसहायता समुहांनी  बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यांची कर्जाची प्रकरणे तात्काळ सात दिवसात मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी  दिल्या. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन्नोती उस्मानाबदअंतर्गत एस.एल.बी.सी. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्याप्रसंगी  रावत बोलत होत्या.
          या बैठकीस जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपूते, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.दुपारगुडे व जिल्ह्यातील सर्व बँकाचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी व तालुक्याचे विस्तार अधिकारी ‍उपस्थित होते.
          यावेळी रावत पुढे म्हणाल्या की, बँकानी स्वयंसहायता समुहाच्या कर्जाची प्रकरणे मंजूर करण्यास व वाटप करण्यास दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.  जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी  सर्व बँकेच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  बँक निहाय कर्ज प्रकरण मंजूरी कामाचा आढावा घ्यावा. इच्छुक महिला स्वयंसहायता समुहांचे कर्ज प्रकरणे  तात्काळ  मंजूर करावेत,असेही निर्देश त्यांनी दिले.  
      या बैठकीत कर्ज प्रकरणांवर बँकनिहाय दाखल व वाटप प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी घेण्यात येऊन पुढील काळात प्रकरणे प्रलं बित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.          

 
Top