बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  उन्हाळ्यामध्ये जाणवणार रक्ताचा तुटवडा कमी करण्याच्या उद्देशाने पूज्य गुरुजी आनंदऋषीजी , गणेशलालजी महाराज व शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरु यांच्या स्मरणार्थ जीवनज्योत संघटना व रोटरी क्लब बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबिरात ८५१ रक्तदात्यांनी उत्स्ङ्गुर्तपणे रक्तदान केले.
दरवर्षी उन्हाळ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. तसेच उन्हाळ्यात शिबिरांची संख्यादेखील कमी असते. त्यामुळे जाणीवपूर्वक संघटना उन्हाळ्यात शि
बिराचे आयोजन करते. सोमवार पेठेतील वर्धमान जैन स्थानकात घेण्यात आलेल्या या शिबीराचे उदघाटन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकरराव जगदाळे यांच्या हस्ते तिमा पुजन करुन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौतम कांकरिया, उद्योजक रावसाहेब पवार,नंदकुमार वाळुंज ,निवासी नायब तहसीलदार उत्तमराव पवार, सपोनि अतुल भोस,रेडक्रॉसचे सचिव डॉ काका सामनगावकर, मातृभुमीचे अध्यक्ष संतोष ठोंबरे,सचिव तापराव जगदाळे, रविकांत करवा, मधुकर डोईङ्गोडे, मुरलीधर चव्हाण, अशोक डहाळे,रक्तपेढीचे सचिव सुभाष जवळेकर,जीवन ज्योत संघटनेचे अध्यक्ष तथा संयोजक अजित कुंकुलोळ,उपाध्यक्ष दिनेश कांकरिया, संतोष सुर्यवंशी,अविनाश तोष्णीवाल, दिलीप कराड आदी मान्यवर उपस्थित होते.सिव्हील हॉस्पिटल सोलापूर, अश्‍विनी सहकारी रुग्णालय सोलापूर रक्तपेढी तसेच बार्शीची श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांनी संकलन केले रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच तरुण व महिलांचा ओघ सुरु होता या शिबीरात सुमारे शंभरपेक्षा अधिक महिला व तरुणींनी रक्तदान केले तसेच पंधरा जोडप्यांनीही या शिबीरात रक्तदान केले.

 
Top