बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  तालुक्यातील नारी येथील परिसराच्या पावसाची नोंद घेण्याचे पर्जन्यमान चक्क खाजगी घराच्या छतावर ठेवल्याने यातून होत असलेल्या नोंदीमध्ये घोळ होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पापड, कुरवडी, सांडगे इत्यादी प्रकारच्या उन्हाळ्यातील वाळवणासोबत हे पर्जन्यमान खाजगी छतावर ठेवण्यात आले आहे. 
     शेतकर्‍यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरणार्‍या अवकाळी पावसाची नोंद नेमकी किती झाली याची तंतोतंत आकडेवारी स’जणे गरजेचे असते परंतु ’नात आले तर छतावरील प्लास्टीकचे टराळे लिटर मापकात आणून ओतायचे, कधी कधी हवेने खाली कोसळते, कधीकधी वार्‍यानेच अंगणात येऊन पडते, पुन्हा ते त्या छतावर नेऊन ठेवण्यात येते. पावसाचे पाणी साठलेले टराळे खाली पडले तर त्या’ध्ये अंदाजे पाणी ओतून त्याची नोंद तहसिल कार्यालयाला कळविण्यात येते असेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या घोळाबाबत परिसरातील शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. सदरचे पर्जन्यमापक हे रामभाऊ दशरथ बागल यांच्या खाजगी जागेच्या छतावर ठेवण्यात आले आहे. सर्कल अधिकारी बेले हे बर्‍याच वेळेस जागेवर आढळत नाहीत. कोतवाल पदावरील कर्मचारी वरिष्ठांच्या मोननंतर खडबडून जागे होतात आणि अंदाजपंचे पावसाची नोंद कळवतात, यामुळे शेतकर्‍यांच्या गंभीर प्रश्‍नाची क्रूर थट्टा केली जाते. शासनाचे निकष व नियमानुसार आरक्षीत केलेल्या जागेवर पर्जन्यमापक बसविणे, त्याची वेळोवेळी तंतोतंत नोंद ठेवणे आणि वरिष्ठांना कळविणे बंधनकारक आहे, परंतु आरक्षीत जागेभोवती कचराकुंडीचे स्‍वराज्य पसरले आहे. छतावरील प्लास्टीकच्या टराळ्यातील अंदाजे पाण्यावरुन परिसरातील नोंद ग्राह्य धरली जाते. यापूर्वी संपूर्ण तालुक्यासाठी बार्शीतील पावसाच्या नोंदीवरुन संपूर्ण तालुक्याची नोंद ग्राह्य धरण्यात येत होती, सदरची नोंद ही अन्यायकारक आणि बेकायदा असल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना दुष्काळाचा सा’ना करुनही दुष्काळी भाग म्हणून मिळणार्‍या सुविधांपासून वंचित राहवे लागले होते. मागच्‍यावर्षी तालुक्यातील विविध १० ठिकाणी अशा प्रकारचे पर्जन्यमापक बसवून त्याची सरासरी करण्याची पध्दत सुरु करण्यात आली होती. यावेळी संपूर्ण परिसरातील वेगवेगळे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती तसेच पर्जन्याची नोंद झाल्याचे दिसून आले आहे. यावरुन यापूर्वी करण्यात येणार्‍या पर्जन्याच्या नोंदी कशा चुकीच्या होत्या हे दिसले, तर काही भागासाठी त्या अन्यायकारकच होत्या तेही यातून उघड झाले आहे. कचार्‍यांनी सांगीतलेल्या नोंदीवर विश्वास ठेवून तहसिलमारत करण्यात आलेली सरासरीची नोंद अधिकृत ग्राह्य धरण्यात आली असली तरी नारी येथील प्रकारावरुन ग्रामीण भागात कोणत्या प्रकारचे बेमिकीरीचे कामकाज चालते हे दिसून येते. यावरुन पुन्हा एकदा कर्मचार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. अथवा विविध ठिकाणी शासकिय सोबत खाजगी व्यक्तींकडेही पर्जन्यमापके बसवून खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे
कर्तव्यात कसूर करुन ग्रामस्थांच्या भावनांशी खेळणार्‍या कर्मचार्‍यांवर वरिष्ठांकडून कोणती कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

 
Top