उस्मानाबाद -  खुल्या (ओपन) प्रवर्गातील किंवा ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे महामंडळ अस्तित्वात नाही अशा प्रवर्गातील आर्थिक मागास लाभार्थीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना राबविली जाते. या योजनेंतर्गंत अर्जदारास पाच लाखाच्या प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.  ही योजना अधिक तत्परपणे, पारदर्शकपणे आणि सहज उपलब्ध होण्याकरिता www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.  गरजूंनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.  यासंदर्भात अधिक माहिती साठी कार्यालयाचा संपर्क क्र. 02472-222236 असा आहे. या शिवाय महामंडळाने 022-28342521/2/3/4/5 या क्रमांकावर हेल्पलाईनही उपलब्ध करुन दिली आहे.
 
Top