बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. शिवाजी महाविद्यालय येथील प्रोपेसर डॉ. भारती रेवडकर यांना अंततराष्‍ट्रीय मान्‍यता असलेल्‍या नांदेड येथील पॅट्रॉ
न संस्‍थेच्‍यावतीने देण्‍यात येणारा 2014 चा राष्‍ट्रीय शिक्षक भूषण पुरस्‍कार जाहीर झाला आहे. दर्जेदार संशोधनात्‍मक लेखनाद्वारे  शैक्षणिक क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या व्‍यक्‍तींहा हा पुरस्‍कार देण्‍यात येतो.
    पॅट्रॉन ही संस्‍था कला, विज्ञान, वाणिज्‍य, अभियांत्रिकी, शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, कृषी, पत्रकारिता, कायदा आदी विषयातील दर्जेदार शोधनिबंध मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित करते. संस्‍थेच्‍यावतीने उतकृष्‍ट शोधनिबंध पुरस्‍कार तसेच शैक्षणिक क्षेत्रात संशोधनात्‍मक कार्य करणा-या व्‍यक्‍तींचा गौरव केला जातो. प्रो. डॉ. भारती रेवडकर यांची आज 19 पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. आंतरराष्‍ट्रीय, राष्‍ट्रीय स्‍तरावर मुमारे 40 संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्‍यांनी स्‍त्रीवादी साहित्‍य, संतसाहित्‍य, लोकसाहित्‍य, यामध्‍ये संशोधनपर लेखन केले आहे. त्‍यांना पॅट्रॉन संस्‍थेचा राष्‍ट्रीय शिक्षक भुषण पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. बी.वाय जाधव, सचिव व्‍ही.एस. पाटील, प्राचार्या डॉ. मधुकर मरताडे, यांच्‍यासह संस्‍थेचे पदाधिकारी, सदस्‍य, महाविद्यालयातील प्राध्‍यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. 

 
Top