पांगरी (गणेश गोडसे) गतवर्षी मिळालेल्या भरघोष उत्पादनाने बार्शी तालुक्यातील बोर उत्पादकांची चांगलीच चांदी झाली होती.त्यामुळे यावर्षीही तेवढ्याच उत्पादनाचा अंदाज गृहीत धरून येणार्‍या आर्थिक उत्पादनाचे गणित ठरवण्यात आले होते.मात्र निसर्गाच्या मनात कांही वेगळेच असल्याचे त्याच्या कृतीतून  शेतकर्‍यांना दिसून आले. उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही हाती पडला नसल्यामुळे दुकानदार,बँका,खाजगी देणी,उसनवार देणी,मुलींची लग्न आदि विषय कसे मार्गी लावायचे असा प्रश्न या बोर उत्पादक शेतकर्‍यांना सध्या पडला आहे.
    गतवर्षी मिळालेल्या उत्पादनातील पैसे यावर्षी जमिनीतील पाणी शोधण्याच्या प्रयत्नात पुन्हा मातीत गेले.त्यामुळे अनेक वर्षांनंतर कमावलेले पैसेही निसर्गाने पुन्हा हिरावून नेले आहेत.उत्पादक शेतकर्‍याकडे पैसे नसल्यामुळे उसनवार देतानाही मोठा विचार या भागात केला जावू लागला आहे.त्यामुळे बोर बागायतदारांचा खुळखुळणारा खिसा मोकळाच राहिला आहे.जवळ भांडवल शिल्लक राहिले नसल्यामुळे बागा जोपासण्यासाठी पैसे कोठून उपलब्ध करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.खत दुकानदारांची देणी अजूनही तशीच बाकी आहेत.
  बँकाचे कर्मचारी रिकाम्या हाताने परत  बोर पिकाच्या लागवडीसाठी,जोपासण्यासाठी,शेतकर्‍यांनी विविध खाजगी,सहकारी बँकाकडून पीक कर्ज घेतले होते.त्या कर्जाची परतफेड बोर उत्पाडांनामधून केली जाते.मात्र यावर्षी उत्पादन मिळाले नसल्यामुळे बँक गावात येऊन रिकाम्या हाताने परतत आहेत.कांहीतरी करून पिक कर्जाचे नवे जुने तरी करून घ्या अशी विनवणी बँक खात्याचे अधिकारी शेतकर्‍यांना करताना दिसून येत आहेत.  कुसळंबची ओळख आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बोराचे गांव अशी झाली आहे.कुसळंबच्या बोरांनी केव्हाच दिल्ली गाठली आहे.मात्र यावर्षी पाणीच नसल्यामुळे मार्च मध्ये हंगाम संपताच सुरू होणारी एप्रिल छाटणी कशी करायची हा मोठा प्रश्न येथील बोर उत्पादकासमोर उभा ठाकला आहे.कुसळंब येथील टोल नाक्यावर बोरे विकून प्रवाश्यांच्या तोंडाला गोडी आणणार्‍या येथील उत्पादकांच्या तोंडाला मात्र चव राहिली नाही.

 
Top