उस्मानाबाद -  अॅसिड व उपरोधिक पदार्थाचे विक्रीबाबत अभिलेख अदयावत ठेवावे त्यात खरेदी विक्री व शिल्लक याबाबीचा समावेश असावा. ज्या ग्राहकांना विक्री केली त्या ग्राहकाचे नाव, पुर्ण पत्ता व खरेदीची मात्रा याबाबतच्या नोंदी घेणे आवश्यक आहे. खरेदीदाराने त्याचे ओळखपत्र  अॅसिड व उपरोधिक पदार्थ खरेदी करतेवेळी विक्रेत्यास दर्शविणे आवश्यक आहे. विक्रेत्यांनी  दर्शविलेल्या ओळखपत्राची नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीस ॲसिड व उपरोधिक पदार्थाचे विक्री करण्यात येवू नये, याची जिल्ह्यातील सर्व अॅसिड विक्रेते व साठा करणाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी जारी केले आहेत.
विक्रेत्यांने अभिलेख्यामध्ये ग्राहक कोणत्या कारणासाठी ॲसिड घेत आहे याचीही नोंद ठेवणे आवश्यक आहे. सर्व विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ॲसिड साठयाची  माहिती बातमी प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत कळविणे बंधनकारक आहे. जर त्यांचेकडील साठयाबाबतची सूचना उपविभागीय दंडाधिकारी  कार्यालयास दिली नाही व त्यांचेकडे अॅसिडचा स्टॉक आढळून आल्यास ते जप्त करुन रुपये 50 हजारापर्यत दंड आकारण्यात येईल. वरील सूचनाचे उल्लघंन केल्यास दंडात्मक कार्यवाहीही करण्यात येईल, याची सर्व विक्रेत्यांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. 
तसेच शैक्षणिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा, दवाखाने, शासकीय विभाग, सार्वजनिक उपक्रम विभागाने देखील ॲसिड व उपरोक्त पदार्थ्याचे साठयाबाबत व वापराबाबतचे अभिलेख अदयावत ठेवून ती माहिती या कार्यालयास सादर करणे  आवश्यक आहे. ॲसीडचा असलेला साठा जबाबदार व्यक्तीच्या निगराणीखाली तपासून त्याचा वापर करण्यात यावा, असेही उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.   

 
Top