उस्मानाबाद - स्वाईन फ्ल्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने तात्काळ कृती आराखडा तयार करावा. येत्या 23 ते 27 मार्च या कालावधीत विशेष स्वाईन फल्यु निर्मूलन सप्ताह साजरा करावा. या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन जनजागृती करावी,
अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वाईन फल्यु विषयक आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत सर्व वैद्यकीय अधिका-यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी  डॉ.नारनवरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी बी. एन. उबाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. बी. पवार, सर्व  उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकिय अधिकारी आदि उपस्थित होते.
तुळजापूर व येरमाळा येथील यात्रेसाठी भावीक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. तेथे भावीकांची गर्दी वाढल्याने स्वाईन फल्युचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळो प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृति आराखडा तयार करुन प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीसानी प्रत्येक घरोघरी जावून स्वाईन फल्युबाबत माहिती घ्यावी. स्वाईन फल्यु आजाराबाबत  भित्तीपत्रिका, पुस्तकाची छपाई करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. गाव व परीसर स्वच्छेसाठी नाल्याची स्वच्छता करावी, प्रतयेक ठिकाणी परीसर स्वच्छतेची मोहीम राबवावी. मातृत्व संवर्धन दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे नावीण्यपृर्ण योजना राबवून 100 टक्के महिलांची आरोग्याची तपासणी करावी. प्रत्येक शाळेत विदयार्थ्यांसांठी हात धुणे, वैयक्तिक स्वच्छतेचा उपक्रम राबवावेत. गावात ग्रामसभा घेवून या सप्ताहात गाव स्वच्छेतेची माहीम राबवावी सर्वांनी आपला परीसर स्वच्छतेकडे लक्ष दयावे, आरोग्य विभागाने सर्व जनतेस दर्जेदार, उत्तम सेवा देण्याकडे लक्ष पुरवावा असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले.याप्रसंगी आरोग्य विभागातर्फे मातृत्व संवर्धन दिनानिमित घेण्यात येणा-या उपक्रमाची माहिती सिनेस्लाईडव्दारे  दाखविण्यात आली.

 
Top