उस्मानाबाद - कृषि सहसंचालक (विप्र-2) आयुक्तालय महाराष्ट्र  राज्य ,पुणे यांच्यावतीने जिल्ह्यातील शेतक-यांना खारीप हंगाम-2015 साठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाणाची साठवण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी त्यांनी शेतक-यांना पुढीलप्रमाणे सूचनावजा आवाहन केले आहे. सन-2014 मध्ये पावसाचे आगमन विलंबाने झाल्याने शेंगा भरताना पिकास ताण पडल्याने सोयबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारत येत नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असून या पिकांचे सर्व वाण सरळ वाण असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची  आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणूनच त्याचा वापर करावा, स्वत:कडील बियाणे वापरल्यास खर्चात बचत होण्यास मदत होईल. बियाणे साठवतांना बियाणाच्या आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्योक्षा जास्त नसावे.
तसेच सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवारण पातळ असते. व बियाणातील बीजांकूर बाहय आवारणाच्या लगत  असते. त्यामुळे बियाणास इजा पोहचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. बियाणे साठवतांना पोत्याची  थप्पी 6 ते 8 थरांची किंवा 6 फुटापेक्षा जास्त नसावी. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी  तालुका कृषि अधिकारी /मंडळ  अधिकारी/ कृषी पर्यवेक्षक/ कृषी सहायक टोल फ्री क्रमांक-18002334000 वर संपर्क साधण्याचे अवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.                     
 
Top