उस्‍मानाबाद - एफ.आर.पी प्रमाणे दर न देणा-या उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्‍यावर कारवाई करावी अन्‍यथा येत्‍या 22 मार्च रोजी उस्‍मानाबाद
जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्‍याचा इशारा  स्‍वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष रविंद्र भिमाशंकर इंगळे यांनी जिल्‍हाधिका-यांना शुक्रवार रोजी  निवेदनाद्वारे दिले.
    उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सर्व साखर कारखान्‍याचे गाळप दोन - तीने महिने होवून सुध्‍दा आद्यापही एकाही कारखान्‍याने एफ.आर.पी. प्रमाणे भाव न दिल्‍यने शेतकरी हवालदिल झाल्‍याचे सांगून निवेदनात पुढे म्‍हटले आहे की, 9 जानेवारी रोजी याप्रकरणी स्‍वाभीमानी शेतकरी संघटनेच्‍यावतीने निवेदन दिले होते. याबाबत कारवाई झाली नाही.  जिल्‍ह्यातील बंद  कारखान्‍यावर  प्रशासन नेमून शेतक-याच्‍या हिताचे निर्णय घ्‍यावे. खासगी व सहकारी साखर कारखान्‍याने ऊसाचे बील पंधराशे रुपये. प्रमाणे काढले असल्‍याचे म्‍हटले आहे. याबाबत  प्रादेशिक सहसंचालक साखर प्रादेशिक कार्यालय नांदेड यांनी कारखान्‍यांना 20 फेब्रुवारी रोजी प्रतिटन 2 हजार 320 रुपये काही कारखान्‍यास देण्‍यास सांगितले. मात्र याप्रकरणी दखल न घेतल्‍याने दि. 22 मार्च  रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर स्‍वाभीमानी शेतकरी संघटनेच्‍यावतीने  अमरण उपोषण करण्‍याचा इशारा दिला आहे.  रविंद्र इंगळे, धर्मराज पाटील, धनंजय पेंदे, विनोद राऊत, नितीन शिंदे, हणमंत शिंदे, धनंजय पाटील यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. निवेदनाची प्रत साखर सहसंचालक नांदेड, मुख्‍यमंत्री, खा. राजु शेट्टी आदींना पाठविण्‍यात आली आहे.  (छाया : रा‍हुल कोरे)

 
Top