उस्मानाबाद -  माहे ऑगस्ट-2015 मध्ये  या कालावधीत मुदती संपणा-या  ग्रामपंचायीच्या सार्वत्रिक निवडणूका व पोट निवडणूकासाठी रीक्त पदासाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. सदर पोट निवडणूकी संदर्भात आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांची  आचार संहिता प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आल्याची  माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
 गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. तसेच संबधित तहसीलदारानी निवडणूक कामी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.     

 
Top