उस्मानाबाद - अवैध दारु विक्रीवर नियंत्रणासाठी  संबंधित विभागाने मोठ्या प्रमाणात धडक मोहिम राबवून छापे मारावेत व संबधिताविरुध्द धडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. 
   येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अवैध्द दारु विक्रीनिमीत्त आयोजित  बैठकीत  डॉ. नारनवरे बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी  उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे, शिल्पा करमरकर,‍अतिरीक्त पोलीस अधिक्षक श्री. भांगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रभोदय मुळे, सरकारी वकील ॲड. शिंदे, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक श्री. बडे,  दारुबंदी विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित  होते. दारु व्यसनामुळे समाजाचे मानसिक, सामाजिक, आर्थीक व शारिरीक ऱ्हास होत आहे. दारुमुळे सामाजिक स्वास्‍थ्य ‍धोक्यात येत आहे. दारुमुळे महिलांचे चांगले संसार उध्दवस्त होत असून त्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. तेंव्हा महिलांनी दारुचे दुष्पपरीणाम  लक्षात घेवून सर्व  महिला व महिला मंडळानी एकत्र येवून दारु विक्रीची दुकाने गावहदृपार करण्याच्या कार्यात योगदान दयावे, असे आवाहन डॉ. नारवरे यांनी केले. 
अवैध तेंव्हा दारु गावातूनच हद्दपार करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी  गावात महिलांसाठी ‍महिला  ग्रामसभा घ्याव्यात. त्यात महिलांचे  ठराव घेवून अवैध दारु विक्रीस बंदीबाबत प्रस्ताव तयार  करुन संबधित विभाग व गृह विभागास पाठविल्यास अवैध्द दारु आळा बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 
Top