उस्मानाबाद – मुरूम ता. उमरगा येथील श्री. विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2015 ते 2020 या पंचवार्षिक कालावधीकरिता घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या नावांची यादी अधिसूचनेद्वारे प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड यांनी जारी केली असून  निवडून आलेल्या संचालक मंडळाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 
उस उत्पादक मतदार गट, एकुरगा- केशवराव नागनाथराव पवार, सुभाष ग्यानबा राजोळे, विठ्ठलराव प्रल्हादराव पाटील, लोहारा गट - शरणप्पा विश्वनाथप्पा पत्रिके, दिलीप बाबुराव पाटील, चंद्रकांत रेवणसिद्ध साखरे,कसगी गट -राजू शरणप्पा हेबळे, संगमेश्वर विश्वनाथ घाळे, विठ्ठलराव चंद्रशेखर बदोले.
मुरुम गट - बसवराव माधवराव पाटील, वैशाली विरसंगप्पा आळंगे, माणिकराव हणमंतराव  राठोड.
उमरगा गट - रामकृष्ण व्यंकटराव खरोसेकर, काझी सादिकसाहेब अब्दुलकादर, जमादार शब्बीर अब्दुलगणीसाब, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था मतदार संघ- बापुराव माधवराव पाटील अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदार संघ- दत्तु रोहिदास भालेराव. महिला मतदार संघ- ईरम्माबाई शरणय्या स्वामी, मंगलबाई व्यंकटराव गरड.  

 
Top