उस्मानाबाद -  येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे डी. टी. एड प्रथम वर्ष मराठी व उर्दु माध्यम छात्राध्यापकांचे समाजसेवा व श्रमसंस्कार शिबीर प्राचार्य  डॉ. कमलादेवी आवटे यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आला.
याप्रसंगी दै.जनप्रवासचे उपसंपादक रणजीत दुरुगकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे  जिल्हा अध्यक्ष नितीन तावडे, अधिव्याख्याता विजय शिंदे,  विभाग प्रमुख डॉ. जटनुरे, पौळ, पाटील, पठाण तबस्सुम उस्मानी  आदींची प्रमुख उपस्थिती  होती.
यावेळी प्राचार्या आवटे म्हणाल्या की, श्रम करणा-या लोकांबदृल आदर्शाची भावना निर्माण करावी व त्याची सुरुवातही स्वत:पासून करण्याचा मौलीक सल्ला दिला. अधिव्याख्याता   शिंदे म्हणाले की, हसत खेळत लहाणपणीच्या श्रमाबदृलच्या आठवणी सांगून माणूस शोभून दिसतो तो मोत्याच्या हाराने नाही, तर श्रमामुळे  हे स्वत:च्या अनुभवातून सांगितले. दुरुगकर यांनी  शिक्षणाबदृल  सद्य स्थिती व बेडूक प्रवृत्ती या विष्यावर मार्गदर्शन केले.  तावडे यांनी श्रमाबद्यल आपणाला घरातूनच शिकवण मिळत असते. कोणतेही काम कमी दर्जाचे नसल्याचे  सांगितले. प्रास्ताविक  गजधने यांनी  दहा दिवसीय शिबीराचे उदीष्टये व कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्र संचलन कु.शिंदे भाग्यश्री यांनी केले तर  आभार कु.शेख रइसा हिने मानले.याप्रसंगी मराठी/उर्दु  माध्यमचे सर्वविद्यार्थी याय कार्यक्रमास उपस्थित होते.
 
Top