उस्‍मानाबाद -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांचा ऊस गाळप करणे व एफ.आर.पी. प्रमाणे दर देण्‍याची मागणी उस्‍मानाबाद
जिल्‍हाधिकारी यांच्‍या‍कडे निवेदनाद्वारे शेतकरी सभासदांनी केली आहे.
    केशेगाव ता. उस्‍मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्‍याच्‍या सभासदांनी  कारखाना कार्यक्षेत्रातील शिल्‍लक ऊस  कारखान्‍यास गाळप करण्‍याबाबत व शासन निर्णयानूसार ऊसाचा दर एफ.आर.पी प्रमाणे देण्‍याबाबत संबंधित कारखान्‍याचे चेअरमन व संचालक मंडळास योग्‍य ते आदेश द्यावे.  तसेच परिसरातील दुष्‍काळजन्‍य परिस्थिती असतानाही संचालक मंडळ कारखाना परिसरातील ऊस घेवून जाण्‍याबाबत टाळाटाळ करीत आहे.  जिल्‍हा बाहेरून  ऊस कमी दराने आणून संचालक मंडळ पैसे कमवत असल्‍याचा आरेप निवेदनात करण्‍यात आला आहे.  
    निवडणुकीपूर्वी कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी व वाहतुकीसाठी जेवढी यंत्रणा होती तेवढी यंत्रणा आता उपलब्‍ध नाही. तरी जिल्‍हाधिका-यांनी याप्रकरणी कारखाना परिसरातील ऊस तोडणीसाठी व एफ.आर.पी प्रमाणे भाव देण्‍याबाबत कारखाना प्रशासनास आदेश देण्‍याची मागणी अॅड. व्‍यंकट गुंड, गणपती राजगुरू, अनिल सावंत, भुजंग चव्‍हाण, रामरतन सुरवसे, पोपट भोसले, चांगदेव माने, दर्शन कोळगे, दत्‍तात्रय गायकवाड, उत्‍तम डोणे, भरत गुंड, राजेंद्र जावळे, अमोल भोरे, डॉ. बाळासाहेब लोमटे आदींनी केली आहे. 

 
Top