उस्मानाबाद -  स्टेट बँक ग्रामीण  स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखाली 18 ते 45 वयोगटातील पुरुष व महिलांसाठी उस्मानाबाद येथे विविध 25 व्यवसायाचे प्रशिक्षणाचा वार्षीक कार्यक्रम आखण्यात आला आहे. या प्रशिक्षणात मोफत भोजन व निवासाची  सोय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.  इच्छुक पुरुष व  महिलांनी या  संधीचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराची निर्मिती  करुन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे.
     महिलांसाठी 21 दिवसीय टेलरींग व डिझायनिंग  या  विषयाचे प्रशिक्षण प्रशिक्षण 1 ते दि. 21 एप्रिल या कालावधीचे 21 दिवसाचे प्रशिक्षण  आणि महिलांसाठी ब्युटी र्पालरचे 30 दिवसीय मॅनेजमेंट  प्रशिक्षण 1 मे ते 30 मेपर्यंत प्रशिक्षण, पुरुषासाठी 6 दिवसीय शेळी पालनचे प्रशिक्षण 2 ते 7 जुनपर्यतचे, महिलांसाठी 6 दिवसीय ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण 2  ते 7 जुनपर्यंतचे प्रशिक्षण, महिलांसाठी 30 दिवसीय कॉम्पयुटर बेसीकचे प्रशिक्षण 9 जुन ते 8 जुलैपर्यतचे  प्रशिक्षण, पुरुषासाठी  21 दिवसीय बेसीक फोटोग्राफी व व्हीडीओग्राफी  प्रशिक्षण 10 जुलै ते 30 जुलैपर्यंत, पुरुषासाठी 6 दिवसाचे कुक्कुट पालनचे प्रशिक्षण 31 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत.  
तसेच पुरुषासाठी 10 दिवसीय  शेळी व मेंढीपालन  7 ऑगस्ट ते 16 आगस्टपर्यत प्रशिक्षण, महिलांसाठी 10 दिवसीय ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम, महिलांसाठी 30 दिवसीय प्रशिक्षण 7 ते 16 ऑगस्टपर्यंत, महिलांसाठी 30 दिवसाचे ब्युटी पार्लर मॅनेजमेंटचे प्रशिक्षण 18 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यतचे प्रशिक्षण,  महिलांसाठी 6 दिवसीय ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम, 18  ते 17 सप्टेंबरपर्यंतचे.पुरुषासाठी मोटार ड्रायव्हींगचे 15 दिवसीय प्रशिक्षण 19 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत, महिलांसाठीचे  21 दिवसाचे टेलरींग व डिझानींगचे प्रशिक्षण 5 ते 25 ऑक्टोबरपर्यंत, पुरुषासाठी 6 दिवसाचे ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम 6 ते 11 ऑक्टोबरपर्यंत, पुरुषासाठी 30 दिवसाचे कॉम्प्युटर बेसीकचे प्रशिक्षण 27 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत, पुरुषासाठी 3‍दिवसीय  मोबाईल रीपेरींग 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत,‍महिलांसाठी 6 दिवसीय ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत, महिलांसाठी 21 दिवसीय टेलरींग डिझायनींग प्रशिक्षण 26 डिसेबर ते 15 जानेवारी, 2016 पर्यत.   तसेच महिलांसाठी 30 दिवसीय कॉम्प्युटर टॅलीचे प्रशिक्षण 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत, पुरुषासाठी 15 दिवसाचे मोटार ड्रायव्हींगचे  प्रशिक्षण 7 मार्च ते 21 मार्चपर्यंत, महिलांसाठी 6 दिवसाचे ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम 8 ते 13 मार्चपर्यंत, पुरुषासाठी 6 दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण 22 मार्च ते 27 मार्च, आणि  पुरुषासाठी 6 दिवसीय ग्रामीण उदयोजकता विकास कार्यक्रम 22 मार्च ते 27 मार्च, 2016 या कालावधात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
   प्रशिक्षण प्रवेशासाठी दारिद्रय रेषेखालील दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड व रेशनकार्ड, जन्म तारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 5 फोटो कागदपत्रे आवश्यक आहे. महिला प्रशिक्षणार्थ्यांला स्वयंरोजगार करण्याची  मनस्वी इच्छा असावी,  प्रशिक्षण कार्यक्रम निवडताना स्वत:ची आवड, शारिरीक क्षमता, आर्थीक कुवत,आजूबाजुला उपलब्ध असणारे साधन सामुग्री, उत्‍पादनासाठी बाजारपेठ व मागणी यांचा पूर्णपणे विचार करणे आवश्यक  आहे.  या प्रशिक्षणासाठी कमीत कमी शैक्षणीक पात्रता पाचवी पास असावी. या प्रशिक्षणात आवश्यक योग/ व्यायाम, व्यक्तीगत विकास, बँक कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन व मार्केटींग शिकविले जाणार आहे. भरपूर प्रात्यक्षिके आणि सराव, उत्तम आणि अनुभवी  शिक्षक संपर्कासाठी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था पवन राजे कॉम्पलेक्स तिसरा मजला औरंगाबाद रोड, उस्मानाबाद  संचालक राजन चुंबळे यांचा मो. क्र. 7875443799, श्री. गोफणे, 9763624998, सौ.सरपाळे-7030320255, श्री. शेख, 9923069923, श्री. सुरवसे, 9552858521  यांचेशी   संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                    

 
Top