उस्मानाबाद -  स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखाली 18 ते 35 वयोगटातील महिलांसाठी उस्मानाबाद येथे दि. 1 ते  21 एप्रिल,2015  या कालावधीचे 21 दिवसीय ड्रेस डीझायनिंग प्रशिक्षण, उस्मानाबाद  येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रवेशासाठी इच्छुक महिलांनी -7875443799 या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरुषासाठी नुकतेच वाहन चालविण्याचे प्रशिक्षणाचा समारोप झाला.याप्रसंगी दुपारगुडे यांनी वाहतूकीचे नियमाची माहिती दिली. डी.आर.डी.चे सहायक प्रकल्प संचालक श्रीपतराव राठोड यांनी रस्ता सुरक्षेबाबत माहिती दिली. संस्थेचे राजन चुंबळे यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांन प्रशिक्षणार्थ्यांस मोलाचे मार्गदर्शन केले.  

 
Top