पांगरी -  वीस हजार रुपये किमतीचे विहीरीवरील इंजिन पाच जणांनी भर दुपारी चोरून नेल्याची घटना आगळगांव (ता.बार्शी) शिवारात घडली असून चोरी केल्याप्रकरणी गावातीलच पाच चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   शुभम सुनील कोल्हे, बाबासाहेब रामचंद्र गंभिरे, नागेश सदाशिव जमदाडे, सिकंदर अल्लामिन तांबोळी, व राकेश गटकळ सर्व रा.आगळगांव अशी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
    दत्तात्रय दशरथ थिटे रा.आगळगांव यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या मालकीचे  आगळगांव शिवारातील आण्णासाहेब गटकळ यांच्या विहीरीवर असलेले गाळ काढायच्या क्रेनचे विस हजार रुपये किमतीचे इंजिन वरील आरोपींनी त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेले.क्रेन मालक थिटे यांच्या फिर्‍यादिवरून पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड हे करत आहेत.

 
Top