उस्‍मानाबाद - नववर्षानिमित्‍त गुडीपाढव्‍याच्‍या दिवशी गवळी समाजाच्‍यावतीने गल्‍लीत म्‍हशी पळविण्‍याच्‍या कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. अनेक शतकापासूनची परंपरा असणा-या या कार्यक्रमास उस्‍मानाबाद शहरातील सर्व पशुपालक आपल्‍या म्‍हशी, रेडे व गायी एक वेगळया व आगळया उत्‍कृष्‍ट अशाप्रकारची सजावट, मोरक्‍या, तोडे, घंटी व हालगीच्‍या रणवाध वाजवून उत्‍साही व आनंदी वातावरणात म्‍हशी पळविण्‍यात येतात. 
    पशुपालक मालक गुराखी यांनी फटाक्‍याच्‍या अतिशबाजी व मोटारसायकलच्‍या आवाजावर या घोंगडीच्‍या इशारावर म्‍हशींचा तोफा व रेडा विषेश ढगात पळविण्‍यात आल्‍या. यावेळी गवळी समाजातील कारभारी काशिनाथ दिवटे व भिमाशंकर दहिहांडे यांच्‍या यांच्‍यासमोर म्‍हैस व रेडा सलाम करून साखरेचा हार व टिळयाचा मान पशुपालक घेत होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी म्‍हशी पळविण्‍याच्‍या कार्यक्रमाचा आनंद नागरिक घेत होते. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रा. गजानन गवळी, मनोज अंजीखाने, केदार उपाध्‍ये, श्रीकांत दिवटे, गजानन पंगुडवाले, दहीहांडे बंधू, खरवरे बंधू, दळवी बंधू , शेरखर बंधू, कदम बंधू, कु-हाडे, राम घोगरे, कल्‍याण खेलगवळी इत्‍यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. भालचंद्र हुच्‍चे यांनी केले.
 
Top