नळदुर्ग  -:  शेतकरी संघटनेच्‍यावतीने सोलापूर - हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 9 व राष्‍ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर क्र.211 वरील जमिनीचा योग्‍य मावेजा मिळवण्‍यासाठी व विविध मागण्‍यासाठी शेतकरी संघटनेचे महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष रघुनाथ पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली मंगळवार दि. 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता  उस्‍मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‍भव्‍य मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    एकरी 50 लाखाचा मोबदला मिळावा, संपादित क्षेत्राचे मोजमाप करून जमिनी अधिग्रहण करावे, चुकीच्‍या नोंदी दुरूस्‍त करून प्‍लॉट धारक व शेतक-यांना योग्‍य न्‍याय मिळावा, संपादित जमिनीवरील फळझाडे, वनझाडे, विहिरी, बोअर पाईपलाईन, घर, गोटा, दगडी पोळ,  मंदिर, पाण्‍याचा हौद, इत्‍यादींच्‍या नोंदी घेण्‍यात यावे., बोरामणी व तांदळवाडी हे दोन्‍ही गावे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यालगत असून त्‍यांना मिळालेल्‍या 1 हजार 391 प्रति चौ.मी. प्रमाणे मावेजा उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील बाधीत शेतक-यांना मिळालेच पाहिजे, 42 टक्‍के दिलासा रक्‍कम सोलापूर जिल्‍ह्याप्रमाणे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील बाधीत शेतक-यांना मिळालेच पाहिजे, बाधीत शेतक-यांना प्रकल्‍पग्रस्‍त प्रमाणपत्र देवून शासनाच्‍या सर्व सुविधा मिळावेत. आदी शेतक-यांच्‍या मागण्‍यासाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे.  या मोर्चात शेतकरी संघटनेचे  मराठवाडा अध्‍यक्ष कालिदासजी आपटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी राम बोंदर, अरविंद घोडके, मुजीब पठाण, बाळासाहेब शेळके, धनू चव्‍हाण, चंदू भराटे, विरसिंह निंबाळकर, धनंजय जोशी, औदुंबर दोंगडे, संतोष राठोड, वसंत वडगावे, बालाजी कुलकर्णी, नागनाथ हांडगे, अरविंद पाटील, गणेश आरळे, नागनाथ घोडके, दिपक घोडके, खंडू कोरे, मुस्‍ताक कुरेशी, शहबाज काझी, शाहू पाटील, बसवराज कवटे, राम गुंजोटो, दिलीप राचेट्टी, जगन्‍नाथ पाटील, अरूण बिराजदार, निजगुण स्‍वामी सागर उटगे, साहेबलालखॉ कमाल, संगमेश्‍वर विभुते, कलावती चटणे, कमला बिराजदार, प्रदिप पाटील आदीजण उपस्थित राहणार आहेत. 
 
Top