पांगरी - माहेरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेस शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला आत्महतेस प्रवृत्त केल्याची घटना महागांव ता.बार्शी येथे घडली.याप्रकरणी पतिसह तिघाविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.कविता माणिक काळे वय 20 असे विष पिऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नांव असून माणिक भालचंद्र काळे(नवरा)पारुबाई भालचंद्र काळे(सासू)व भालचंद्र काळे(सासरा) अशी आत्महतेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
 मयताचे वडील दत्तू मनोहर पवार रा.पानगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.मयत कविता हिने दिनांक 2 सोमवारी महागांव येथील रहात्या घरी सतत होणार्‍या त्रासास कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते.काल दि.3 मंगळवारी जगळळे मामा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या मृत झाल्या.माहेरून पैसे घेऊन ये,नाहीतर राहू देणार नाही असे म्हणून दारू पिऊन येऊन कविता हिज त्रास दिल्याचे फिर्‍यादीने फिर्यादीत म्हटले आहे॰पांगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास स.पो.नि.सोमनाथ वाघ करत आहेत.

 
Top