बार्शी - उजनी जलाशयातून बार्शी - कुर्डवाडी संयुक्‍त पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. बार्शी शहराला होणा-या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन बार्शीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर फुटल्‍याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.  
     मागील अनेक वर्षापासून राजकीय वरदहस्‍त असलेल्‍या नागरिकांकडून जाणीवपूर्वक पाईपलाईन फोडून खाजगी ऊसाच्‍या शेती मालविण्‍याचे काम राजरोसपणे करण्‍यात येते. सदरच्‍या शेतक-यावर फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची गरज असताना त्‍यांना कुरवाळण्‍याचे काम प्रशासनाकडून करण्‍यात येते. या पाईपलाईनच्‍या देखरेखीसाठी कोठयावदी रूपयाचा ठेका देवून कर्मच्‍या-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असताना त्‍यांच्‍याकडून प्रामाणिकपणे काम होत नाही. अनेकांचे हस्तिसंबंध जोपासल्‍यामुळे भर उन्‍हाळयातही बार्शीतील लाखो नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. सदरच्‍या पाईपलाईन गळतीनंतर आजूबाजूच्‍या शेतक-यांनी स्‍वताच्‍या विहीरी भरून घेण्‍याचे काम केले. व त्‍यानंतर नगरपालिकेच्‍या कर्मचा-यांना कळविल्‍याने नेमकी पाईपलाईन फुटली की फोडली यागागत प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. 

 
Top