उस्मानाबाद - येत्या दि. १६ मार्च पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असून कोकण वगळता इतर भागात वादळी वा-यासह हलक्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. फळबाग बागायतदार शेतक-यांना कृषि विभागातर्फे मौलीक मार्गदर्शन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना करुन आपले फळबाग पीकांचे व शेतीचे  सरंक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
द्राक्षे डाळिंब,कलिंगड, खरबुज, संत्रा, मोसंबी व केळीच्या परिपक्व झालेल्या फळांची तसेच तयार फळभाज्या आणि भाजीपाला यांची काढणी करून माल त्वरीत विक्रीसाठी पाठवावा. अधिक पाऊस झाल्याने पाणी जमिनीत साठल्यास ते चराद्वारे शेताबाहेर काढावे व काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवण करुन आपल्या शेतीचे फळबागेचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top