उस्मानाबाद - उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक मर्या. उमरगा,ता. उमरगा जि.उस्मानाबाद या संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुक पार पाडली.  या निवडणूकीत उमेदवार व्यवस्थापन समितीच्या त्या-त्या जागेवर यथोचितरीत्या अविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अविरोध  निवडून  आलेल्या संचालक मंडळाची नावे  पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत.
        सर्वसाधारण मतदार संघातून -कवठा (ता.उमरगा) सोनवणे विजयकुमार धोंडीराम, सालेगाव (ता. लोहारा) साळुंके गोविंदराव जयवंतराव, (अजयनगर,उमरगा) माने सुनिल चंद्रभान, (जुनी पेठ-उमररगा) मुसांडे नानासाहेब सिद्राम, (एकोंडी रोड, उमरगा) डॉ. मलंग मल्लीनाथ शरणप्पा, (न्यु. बालाजीनगर उमरगा)  मोरे शिवाजी श्रीधरराव, बलसूर ता उमरगा गटातून बिराजदार सुरेश माणिकराव, अनु. जाती/ जमाती मतदार संघातून (एकूरगा ता.उमरगा) गायकवाड संजय तुकाराम, महिला राखीव मतदार संघातून (मुळज ता. उमरगा) सौ. चालुक्य विजया शिवाजीराव, (अजयनगर,उमरगा) सौ. इंगळे छाया सतीषराव, इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदार संघातून (कडदोरा, ता.उमरगा), पाटील साहेबराव पांडुरंग  आणि वि.जा/भ.ज. व वि. मा. प्र. गटातून बलसूर  ता.उमरगा येथील  घोडके इंद्रजीत कृष्णाची यांची  संचालक म्हणून अविरोध ‍निवड झाली.एस. एस. कुलकर्णी  निवडणूक निर्णय  अधिकारी म्‍हणून काम पाहिले.याबाबतची माहिती  विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे. 

 
Top