बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)   पुणे येथील एक्सलन्स ध्यास आणि बार्शीतील अजित फौंडेशनच्या वतीने स्थलांतरीत भटक्यांना सुमारे सहा क्विंटल गहू व तांदूळ धान्य वाटप करण्यात आले.
बंजारा, गोसावी, पाथरवट, शिकलकर आदी ३० कुटूंबाला याचा लाभ मिळाला.
लातूर रोड येथे शासकिय विश्रामगृहासमोर हा धान्य वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष रमेश पाटील, एक्सलन्सचे अविनाश होसमणी, प्रज्ञा सोनी, उमेश वसाळवे, रोटरीचे गौतम कांकरिया, लायन्सचे प्रकाश फुरडे, नाना कदम, नगरसेवक दिपक राऊत, देवीदास उर्फ मुन्ना शेटे, राष्ट्रवादीचे मनिष चौहान, आनंद सोमाणी, राजेंद्र आडसूळ, नारायण माने, संजय चव्हाण, सायरा मुल्ला, सुलभा मिरगणे, अजित फौंडेशनचे महेश निंबाळकर, रमेश कासवटे, शंकर गव्हाणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना रमेश पाटील म्हणाले, भटक्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करावी, नगरपरिषदेच्या वतीने सुविधा देण्याचा प्रयत्न करु. कांकरिया म्हणाले, शिक्षणाच्या संधीसाठी रोटरीच्या वतीने स्कूल ऑफ व्हिल उपक्रक सुरु करु. प्रज्ञा सोनी म्हणाल्या, उसतोड, वीटभट्टी, बांधकाम यासारख्या विविध ठिकाणच्या कामगारांची मुले अनेक वेळा बालमजुर होतात. त्यांच्यासाठी शिक्षणाचे उपक्रम सुरु करुन वंचित व दुर्लक्षीतांना चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करावा.

 
Top