पांगरी  (गणेश गोडसे)  पांगरी (ता.बार्शी) येथे विभागीय संभाजी ब्रिगेड मेळावा व शिवजयंती मंडळाचा सत्कार समारंभाचे रविवारी दि. 29 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशिद यांनी पत्रकाद्वारे दिली.     पांगरीतील हनुमान मंदिर सभागृहात पार पडणार्‍या या कार्यक्रमात मधुकर डोईफोडे यांचे 'शिवचरित्र व आजच्या युवकांचा आर्थिक विकास' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या गुणीजनाचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी पांगरी विभागप्रमुखासह कारी गणप्रमुखाची नावे यावेळी जाहीर केली जाणार आहेत.
        यावेळी मराठा सेवा संघाचे बार्शी तालुकाध्यक्ष डॉ.मधुकर फरताडे,तालुका उपाध्यक्ष किरण गाढवे,नूतन पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते,रोहित कादे,संभाजी घाडगे,खंडू डोईफोडे,आनंद गवळी,सोमनाथ खोडवे,लखण मडके,गणेश चव्हाण,नितिन पवार,बालाजी डोईफोडे,विनोद धावणे,केदार चोबे,राहुल चित्राव आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवल्याबद्दल श्री.चक्रधर ताकभाते(श्रीपतपिंपरी) व पांगरीतील कु.जरीना बागवान याचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकातर्फे  करण्यात आले आहे.

 
Top