उस्मानाबाद - जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने  उस्मानाबाद येथे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण मैदानी, खो-खो व कुस्ती खेळाचे शिबीर 10 ते 30 एप्रिल,2015 या कालावधीत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
   उन्हाळयाच्या दीर्घ सुट्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले क्रीडाविषयक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाते. यात तज्ञ व अनुभवी शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव- खो-खो, गणेश पवार-मैदानी, संदीप वांजळे-कुस्तीचे या खेळांचे मार्गदर्शन करणार आहेत तसेच सूर्यनमस्कार,सर्वांगण सुंदर व्यायाम प्रकार, योगासने, प्राणायम, ॲरोबीक्स, मनोरंजनात्मक खेळ व व्यक्तीमत्व विकास या बाबीवर विशेष  भर दिला जाणार आहे.
या शिबीरात सहभाग होणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिला जाणार असून इच्छुकांनी आपले नावे जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालय श्रीतुळजा भवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत नोंदवावी, असे आवाहन  जिल्हा  क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
श्री.जाधव सत्येन-9028095500, पवार गणेश-9970095315 व वांजळे संदीप- 9850954237 यांच्याशी संपर्क साधावा. प्रशिक्षणाची वेळ सकाळी 6-30 ते 8-30  व सायंकाळी 5 ते 7 अशी वेळ राहील, असेही  पत्रकात नमूद आले आहे.      
 
Top