नळदुर्ग  -  जळकोट ता. तुळजापूर  येथे  शिवजयंतीनिमित्त आयोजित  मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात सव्‍वासहाशे रूग्‍णांची तपासणी करण्‍यात आली.या शिबीराचे  उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी एम.के. भांगे यांनी केले. 
  या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी अँड. अंगद कदम तर डॉ. सतीश पाटील, नायब तहसीलदार एम.एम. चव्हाण, निवृत्‍त पोलिस निरीक्षक  एस.बी. कदम, माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, माजी सरपंच अशोक पाटील, बंकटराव कदम, उपसरपंच बंकट बेडगे, तंटामुक्तीचे  अध्यक्ष बसवराज कवठे, रिपाइंचे अरुण लोखंडे आदींची उपस्थिती होती. शिबिरात डॉ. राजकुमार पाटील, डॉ. बसवराज पाटील, डॉ. श्रीकांत फुलारी, डॉ. कविता एस. डॉ. सिद्धेश्‍वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली २0 डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली.यापैकी २२ रुग्णांवर सोलापूर येथे अश्‍विनी रुग्णालयात पुढील उपचार केले जाणार आहेत. 
कार्यक्रमास कृष्णांत मोरे, गोविंद चुगे, शाहुराज पाटील, यशवंत कदम, ईरण्णा हौसेकर, बसवेश्‍वर स्वामी, संजय अंगुले, डॉ. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी किशोर कदम, डॉ. संजय कदम, नागराज जाधव, अमोल पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिनेश कलाल तर आभार श्रीकांत कदम यांनी मानले

 
Top