उस्मानाबाद - जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. 5 एप्रिल,2015 रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा-2015 सकाळी 11 ते 12 आणि दुपारी 2-30 ते सायंकाळी 5  या कालावधीत खालील परीक्षा सहा परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या  परीक्षा केंद्राच्या  100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
यानुसार श्रीपतराव भोसले हायस्कुल जुनी इमारत उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज तळमजला, उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज पहिला मजला, उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज दुसरा मजला, उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज तिसरा मजला, उस्मानाबाद आणि शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, उस्मानाबाद या सहा केंद्रावर  या परीक्षा होईल.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स सेंटर्स, पानपटटी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्राच्यापरीसरात मोबाईल, फोन सेल्युलर फोन, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर वाहन प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.  परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले  अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक  व्यक्तींना एकत्र  येता येणार नाही. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी,परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 5 एप्रिल च्या सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 9 सायंकाळी 6 वाजेपर्यत लागू राहतील.                      

 
Top