पांगरी (गणेश गोडसे) सलग चार वर्षापासून दुष्काळाच्या छायेखाली जगत असलेल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब परिसरातील बोर उत्पादक शेतकर्‍यांच्या मागे गतवर्षीचा अपवाद वगळता पाच वर्षापासून शुक्‍ल काष्टच लागले असून पाण्याभावी या वर्षीचा बोराचा हंगाम वाया गेल्यामुळे व सापडलेला हंगामातील बोरे कवडीमोल दराने विकली गेल्यामुळे आता बागा जगवायच्या कश्या,कर्जे फेडायची कशी,आता पुढे काय आदि प्रश्नांनी बोर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुका कृषि खाते मात्र या परिस्थितीकडे ढुकूनही पहाण्यास तयार नसून यावर कांही उपाय योजना करता येतात का हे पाण्यापेक्षा कृषि विभाग हा फक्त बघ्याची भूमिका घेत असून बोर बागा व उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होणे गरजेचे आहे. 
    कुसळंब  भागातील आगळगांव,भोयरे,धोत्रे,घारी,पुरी,पांगरी,धानोरे,खामगाव,आरणगांव आदि गावातील जमीन हलक्या व मुरमाड प्रतीची असल्यामुळे व प्रजन्यमानाचे प्रमाण या भागात अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांनी  25 वर्षापूर्वी बोर बागांची लागवड करण्यास सुरुवात केली.उमरान,कडाका,चवारा,अॅपल या जातीच्या बोराचे मोठे उत्पादन येथे घेतले जाते.प्रतिवर्षी बोर लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत जावून आज एकट्या कूसळंब मध्ये आज 150 हेक्टर पर्यन्त बोराची लागवड झाली आहे.सुरवातीची कांही वर्षे बरी गेली.मात्र नंतर या बोरच्या शेतीला दृष्ट लागली.गतवर्षीच्या(14) हंगामाचा अपवाद वगळता या बोर उत्पादकांच्या पदरी निराशाच आली आहे.  नोव्हेंबर ते मार्च दरम्यान चालणारा बोर विक्रीचा हंगाम यावर्षी पाण्याभावी दोन महीने अगोदरच संपुष्टात आला असल्यामुळे बोर उत्पादक शेतकर्‍यांना कोट्यावधी रुपयांचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असून त्यामुळे या भागाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे.गतवर्षी कडाका या बोराच्या जातीस 30 ते 40 रुपये दर मिळाला होता तर यावर्षी 8 ते 18 दरम्यान दर मिळाला.उमराण बोरास 30 ते 38 रु.दर मिळाला होता यावर्षी जेमतेम 4 ते 8 रुपये दर मिळाला.चवारा या बोरास गतवर्षी 34 ते 38 रु.दर मिळाला होता तर यावर्षी या बोरास व अॅपल बोरास बाजारपेठेत उठाव नसल्याचे कारण सांगून व्यापार्‍यांनी हे वान घेण्यास टाळाटाळ केली.
     साधारणत: एकरी साठ हजार रुपयांचा खर्च बोर बागांची मशागत,मजुरी,खते औषधे आदीवर होत असतो.मात्र यावर्षी बोरांचा ग्म्गाम सुरू होण्यापूर्वीच पन्नास टक्के बोर उत्पादक शेतकर्‍यांच्या कूपनलिका,विहिरी यांनी दम सोडल्यामुळे बोरांनी लकडलेले प्लोट्स जागेवरच वाळून गेले.त्यामुळे या शेतकर्‍यांच्या बोरांची विक्रीच न झाल्यामुळे हातात एक दमडीही पडू शकली नाही.तसेच झाडावर बोरे आडकल्यामुळे ते झाडांचा रस शोषून घेत असल्यामुळे झाडांनाही नुकसान पोचू शकते असे बोर उत्पादकांचे म्हणणे आहे.यातूनही झाडे टिकल्यास तुटाळ होऊन पुढील वर्षी उत्पादनात मोठी घाट होणार आहे.त्यामुळे यावर्षीही व पुढील वर्षीही असे नुकसानीचे टप्पे रहाणार आहेत.

 
Top