पांगरी (गणेश गोडसे) छोट्या छोट्या गोष्टीत शोधल्यास खूप मोठे कांहीतरी सापडू शकते, त्यासाठी शोधक नजर असणे गरजेचे असते असे प्रतिपादन संजीव सोनवणे यांनी केले.ते उक्कडगांव (ता.बार्शी) येथे बालाघाट पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 
   मराठी भाषा दिनानिमित्त पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बालकवी,कुसुमाग्रज,मंगेश पाडगावकर,विंदा करंदीकर आदी कवीच्या कवितेचे वाचन करण्यात आले.प्रा.डी.बी.जाधव,राऊत एस.एल,एस.एस.शिनगारे यांनीही आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले.
 विज्ञान दिनाचे औचित्य साधून येथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.मेंदूची कार्यप्रणाली,रोकेटची संकल्पना,क्रेन,प्रकाशाचे प्रवर्तन,ज्वालामुखी,मूत्रपिंड,ह्दय,फुपुसे,बायोग्यास,पाणी शुद्धीकरण,पवनचक्की,चुंबकत्व आदि विषयावरील प्रयोग सादर केले.प्रारंभी भारतीय वेज्ञानिकांची उपस्थित विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.या विद्यार्थ्यांना सौ.आर.ए.पांचाळ, कु.बी.डी.देशमुख,एस.आर सय्यद,एन.एस.कुमठेकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रदर्शंनानंतर  संस्था अध्यक्ष संजीव सोनवणे,प्राचार्य विशाल जमाले,मुख्याद्यापक किरण पडवळ,यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

 
Top