उस्मानाबाद -  येरमाळा (ता. उस्मानाबाद) येथे 3 ते 9 एप्रिल या कालावधीत     येडेश्वरी देवीची यात्रा भरत असून या यात्रेस 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतात. पालकी, मिरवणूका व इतर धार्मिक कार्यक्रमानिमीत्त मोठ्या प्रमाणात भावीकांची येथे गर्दी असते. 
          यात्रा शांततेच्या वातावरणात पार पाडता यावी, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी मुंबई  दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्र. 142 (1) अन्वये  श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरातील व येरमाळा गावातील सर्व देशी/ विदेशी / एफएल/बी आर-2/ परवानाकक्ष / ताडी विक्रीची केंद्र दि. 4 ते  5 एप्रिल या दोन दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 

 
Top