उस्‍मानाबाद -: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा शिवसेनेच्यावतीने उस्‍मानाबाद शहर  व पुर्ण जिल्ह्यात उत्साह वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने अनेक ठिकाणी सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
   जिल्‍हा शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८५ वी जयंती आज शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी आठ वाजता शिवाजी चौकात असणा-या छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपतीचा जयजयकार करुन हा परिसर दणाणून सोडला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
    या दुग्धाभिषेक कार्यक्रमानंतर येथील शिवाजी चौकातच शिवछत्रपतीच्या सिंहासनारुढ असणा-या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, नगरसेवक सोमनाथ गुरव, युवा सेना उपजिल्हाधिकारी अक्षय ढोबळे, बाळासाहेब देशमुख, बापू साळुंके, लिंबराज डुकरे, विश्वजीत देशमुख, प्रणिल रणखांब यांच्यासह शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे आदी पदाधिकाNयासह शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नुकताच पार पडलेला शिवजयंती उत्सव अतिषय सुरेख पध्दतीने व विविध उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजी चौकातील मुर्ती प्रतिष्ठापणेनंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्नालयातील रुग्नांना मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाहू महाराज, तालुकाप्रमुख सर्वश्री मोहन पनुरे, राजअहमद पठाण, अनिल शेंडगे, रामलिंग आवाड यांच्यासह भगतसिंह गहीरवार, कमलाकर दाणे आदिसह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
     या फळवाटप कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या वतीने भगवे ध्वज लावून शहरातून भव्य अशी मोटारसायकल व रीक्षा रॅली काढण्यात आली. डोक्याला भगवे पेâटे, गाडीवर भगवा झेंडा व मुखाने छत्रपतीचा जयजयकार करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भव्य अशी भगवी रॅली शिवाजी चौकातून निघून देशपांडे स्टँड, इंगळे गल्ली, नेहरु चौक, काळा मारुती चौक, बार्शी नाका, भोसले हायस्वूâलच्या प्रांगणात आले व त्याठिकाणी या भगव्या महारॅलीचे विसर्जन करण्यात आले. 
विविध ठिकाणी शिवजयंती साजरी
शिवसेनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक चौकात भगव्याच रंगाचा मंडप टाकून त्या मंडपामध्ये छत्रपती प्रतिमा, मुर्तीचे पुजन करुन कार्यकर्त्‍यांनी ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. 
 
Top