बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) भारतीय जनता पार्टी विधी आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदी बार्शीच्या ऍड्.गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आणि भाजपा विधी आघाडीचे संयोजक ऍड्.मोतीसिंह मोहता यांनी चव्हाण यांना निवडीचे पत्र दिले आहे.
चव्हाण यांनी पुणे येथे एलएलबीची पदविका पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे एलएलएम पदविका प्राप्त केली. सोलापूर जिल्हा युवा मोर्चाच्या चिटणीसपदी तसेच मुंबईतील केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळून बार कौन्सिल, वकिलांच्या अडचणी, न्याय खात्याशी संबंधीत प्रश्‍नांवर, न्यायव्यवस्था गतीमान करण्यासाठी विशेष काम करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले.

 
Top