नळदुर्ग -  अणदूर ता. तुळजापूर येथिल एकास दोनदिवसांत बिनव्याजी सुलभ हप्त्यामध्ये कर्ज देण्याच्या आमिषाने  ४९ हजार रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी  दिल्ली येथील दोघाविरूध्‍द नळदुर्ग पोलिस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली आहे. 
      रितेशकुमार व राजकुमार रा. दिल्ली या दोघाविरूध्‍द  नळदुर्ग पोलिसात  तक्रार दिलेल्‍याचे नावे आहेत. यातील  विजय गोविंद मोकाशे रा. अणदुर ता. तुळजापूर यांनी एका वृत्तपत्रातील कर्ज मिळेल, ही जाहिरात वाचली. त्यानुसार बिनव्याजी, तारणाची आवश्यकता नाही, तसेच सुलभ हप्त्याने परतफेड करावी लागणार असल्याचा मजकूर यामध्ये होता. त्याला भुलून मोकाशे यांनी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस आला. मोकाशे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. यासाठी त्यांना प्रथम बँक खात्यावर २१५० रुपये भरण्यास सांगण्यात आले. कर्ज मिळेल या आशेवर  मोकाशे यांनी रक्कमेचा भरणाही केला. त्यानंतर दोन दिवसांत तुम्हाला कर्ज मिळेल, असे सांगण्यात आले. परंतु, कर्ज देण्याऐवजी पुन्हा वारंवार रक्कम भरण्यास सांगितले. अणदूर व तुळजापूर येथील बँकेत रितेश कुमार यांच्या बँक खात्यांवर ४९ हजार रुपयांचा भरणा केला. त्यानंतर मात्र, दिल्ली येथील रितेशकुमार आणि राजकुमार या भामट्यांचा सपर्क होईना. चुकून संपर्क झालाच तर समोरून फोन कट करण्यात येऊ लागला. मोकाशे यांनी अणदूर येथील स्टेट बँकेतून ३११५९२४३१८१ या खात्यावर १७ हजार आणि तुळजापूर येथील कॅनरा बँकेतून ०३६७१०१२०३५२५ या खात्यावर ३२ हजार रुपये रुपये भरले आहेत. या दोन्ही भामट्यांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे मोकाशे यांच्या लक्षात आले. त्यानंतर तयानी  पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  

 
Top