उस्मानाबाद, -  शेतक-याचा ख-या अर्थाने शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन विकास साधाला जात असुन बळीराजाच्या विकासासाठी शासन निधीची कमतरता पडु दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तुळजापूर येथील कृषि संशोधन केंद्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ,परभणी, आत्मा, कृषि विभाग, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषि तंत्रज्ञान महोत्सव,गट प्रमुख कृषि मित्र मेळाव्यात  बोलत सांगितले .
        कृषि विभागाने नव-नवीन तंत्रज्ञान शोधुन आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहविण्यात मोलाची भुमीका पार पाडावी. शेतकऱ्यांचे हिताचे उपक्रम राबवावेत. उत्कृष्ट शेतकरी गटास प्रोत्साहन दयावे, शेतकरी गटास कंपनी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करुन शेतकरी गट  सक्षम करावेत,असे निर्देश संबधित यंत्रणेस देवुन पुढे नारनवरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवाराअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा वापर शेतीसाठी करावा. कमी पाण्यात येणारी पीके घ्यावीत. राज्यात सर्वाधिक शेतकरी गट या उस्मानाबाद जिल्ह्यात स्थापन झाल्याचे त्यांनी आवर्जुन उललेख केला. सुशिक्षित तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसायाकडे वळल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलशेती, भाजीपाला, दुधउत्पादन, वेलवर्गीय,  रेशीम शेती होत असल्याने या जिल्ह्याच्या विकासात भर पडत असल्याचे सांगितले.  महिलांनी  शेतीच्या कार्यात झोकून दयावे. पुर्वी शेती सुधारण्याच्‍या कामात श्रीमंत शेतकरीच अग्रेसर राहत असे, आज ही परीस्थिती बदली आहे. उस्मानाबादचा   शेतकरी  शेतकरी गट स्थापन करुन कंपनीचा मालक  झाल्याचे त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. शेतकऱ्यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून कृषिचे बि-बीयाणे,खते, औजारे, साहित्य शेतकरी  गटामार्फत खरेदी केल्यास ती कमी व वाजवी  दराने मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी अभिमन्यु बोधवड, तहसीलदार निलेश  श्रीरंगी, आत्माचे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, उपसंचालक सुभाष चोले, लातूरचे रेशीम विकास अधिकारी रमेश मिसाळ, परभणी कृषी विद्यापीठाचे  अरुण गुट्टे, कार्यक्रम समन्वयक विलास टाकणखार, विशेष तज्ञ सचिन सुर्यवंशी, डॉ. आरदाड, डॉ. अनिता जिंतूरकर,  तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, कृषि क्षेत्रातील तज्ञ, विशेष तज्ञ, कृषि अधिकारी, कर्मचारी,  ,विविध  कंपन्याचे पदाधिकारी,  शेतकरी   ‍उपस्थित होते. 
डॉ. नारनवरे यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार केला. त्यांनी  विविध स्टॉलना भेट देवून  शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तृणधान्य भरडधान्य योजना, चारा उत्पादन प्रकल्प, अझोला उत्पादन प्रकल्पास भेट दिली. कृषि विज्ञान केंद्र व आत्मातर्फे तृणधान्य, बहुगुणी सोयाबीन याविषयी काढण्यात आलेल्या  पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. 

 
Top